अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाच्या अनोखी सुरुवात
आद्यक्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य तरुणांना ऊर्जा देणारे..
अनिल हिवाळे यांचे प्रतिपादन
जालना प्रतिनिधी हनुमंत दवंडे
राष्ट्रकार्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अखंडपणे इंग्रजांशी झुंजत इंग्रज विरोधी क्रांतिकारकांची पलटण उभी करीत आद्यक्रांतिकार म्हणून महत्वाचे योगदान देणारे आद्यक्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य तरुणांना ऊर्जा देणारे आहे.असे प्रतिपादन लहुजी विद्रोही सेनेचे तालुका प्रमुख अनिल हिवाळे यांनी केले.
परतूर येथील रेल्वे स्थानक परिसरातील आद्यक्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे चौक येथे लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी अनिल हिवाळे बोलत होते याप्रसंगी
सर्जेराव हिवाळे,गणेश थोरात, अनिल थोरात, प्रदीप फुलमाळी, रामा हिवाळे,राहुल थोरात, करण खनपटे,भारत थोरात, अशोक काळे, विजय कांबळे,भारत हिवाळे,विलास जाधव, गणेश जाधव,योगेश गायकवाड, मांगीलाल धोत्रे, मांगीलाल राऊत, कृष्णा कांबळे,भागवत जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अनिल हिवाळे म्हंटले की,लहुजी
वस्ताद यांचे वडील क्रांतिकारी राघोजी साळवे इंग्रजां विरुद्धच्या लढाई
मध्ये धारातीर्थी पडले त्याप्रसंगी देशभक्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी या प्रेरणेतून जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली.छत्रपती शिवरायांचे स्वराज परत यावे,हा देश स्वतंत्र व्हावा,येथील रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी देशात सशस्त्र क्रांतीकरून इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारण्या-
साठी तालीम सुरू केली लहुजींच्या तालमीत व्यायामाचे धडे घेण्यासाठी शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले,लोकमान्य टिळक,वासुदेव बळवंत फडके,विठ्ठल वाळवेकर,
नाना मोरोजी,उमाजी नाईक सखाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ,गोवंडे गुरुजी आदींनी प्रशिक्षण घेतले.लहुजींनी सर्व शिष्यांना कुस्ती,दांडपट्टा, लाठीकाठी,नेमबाजीचे आदींचे प्रशिक्षण दिले.
अनेक महान क्रांतिकारक तयार करून या देशात क्रांतीचे वादळ सुरू केले
क्रांतीगुरू लहुजी आणि मातंग योद्धा फकिरा यांचे कार्य तरुणांना स्फूर्ती देणारे आहे तर पीडितांना आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि अन्याया
विरुद्ध लढण्यासाठी आग प्रज्वलित करणारा आहे.
असे मत अनिल हिवाळे यांनी व्यक्त केले.
