अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत खासदार सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या,
सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
एका नेत्याच्या घरातून निघून गेलेल्या मुलीला शोधण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा उभी राहते. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी सापडत नाही न्यायासाठी वणवण फिरणारे देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यातील अश्रूं मात्र सरकारला दिसत नाहीत अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे या सरकारवर चांगल्याच भडकल्या, यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे. आमदार सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट व उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संदीप क्षीरसागर यांचे जुन्नरमध्ये झालेल्या भेटीत संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या… या दोन्ही भेटीमध्ये खूप अंतर आहे. आपण सुद्धा दिल्लीत नेहमीच मंत्र्यांची भेट घेतो. त्यात वागवे काय आहे. ज्या मंत्र्यावर मी भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप केले, तो विशेषयच कोठे राहिला नाही,
