अजिंक्य महाराष्ट्र आणि मुलगा सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
शिवजन्मभूमीत रंगणार स्वराज्य महोत्सव
संपादक संतोष लांडे
जुन्नर तालुका पुणे जिल्हा
आमदार शरद सोनावणे
शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या हिंदवी स्वराज्य महोत्सवानिमित्त जुन्नरमध्ये १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान चार दिवस भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये महानाट्य, बैलगाडा शर्यती, मर्दानी खेळ, कबड्डी स्पर्धा, सांस्कृतिक सोहळ्याची रेलचेल अनुभवता येणार आहे. यंदापासून कुस्ती स्पर्धेचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. शिवनेर केसरी चषकासाठी होणाऱ्या या स्पर्धेसाठी एक लाख रुपये पारितोषिकासह चांदीची गदा दिली जाणार आहे. शिवजयं सोहळ्याचे अध्यक्ष आमदार शरद सोनवणे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. किल्ले शिवनेरी प्रकाशझोताने चार दिवस रात्रीच्या वेळी प्रकाशमान करण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी सायंकाळी महाआरती
शिवजयंती ६६ सोहळ्यासाठी १९ फेब्रुवारीला येणाऱ्यांना पास देण्याची पद्धत यंदापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शिवजन्मस्थळी शिवभक्तांना येण्याचा मार्ग खुला ठेवला जाणार आहे. शासकीय सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी पास असतील.
होणार असून, यासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई उपस्थित राहणार आहेत. सहा वाजता शोभायात्रेचा प्रारंभसांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. शिवरायांना जयंतीच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता मानवंदना देण्यासाठी प्रथमच भव्य फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
