अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
भाजपा सदस्यता महाअभियान २०२५: विदर्भ संघटन पर्व कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर येथे दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व सदस्यता महाअभियान अंतर्गत विदर्भ विभागाची भव्य कार्यशाळा संपन्न झाली. पक्षाच्या विस्तार आणि संघटन मजबुतीसाठी या कार्यशाळेला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या कार्यशाळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गती मिळाली. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, राज्यात भारतीय जनता पक्षाने एक कोटी सदस्यसंख्येचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आगामी काळात हा आकडा दीड कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपा कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन केले. विक्रांतजी पाटील यांनी या अभियानाचा आढावा सादर करत सदस्य नोंदणी आणि विस्तार योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेस मा. खा. अशोकजी नेते, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा सरचिटणीस आ. रणधीरजी सावरकर, भाजपा सरचिटणीस राजेशजी पांडे, भाजपा सरचिटणीस आ. विक्रांतजी पाटील, संघटन मंत्री विदर्भ डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आ. डॉ. संजयजी कुटे, आ. कृष्णाजी खोपडे, आ. चरणसिंग ठाकूर यांच्यासह पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
गडचिरोलीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी
गडचिरोली जिल्ह्यातून देखील या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटन पर्व सदस्यता अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष अधिक बळकट आणि व्यापक होत असून, भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा राहील, असा दृढ विश्वास या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या या अभियानात पुढाकार घेत आपल्या जबाबदारीची जाण ठेवावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
