एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डिजिटल साक्षरतेचा सामर्थ्य घडवून चांगल्या भविष्याची निर्मिती – मा सुरेश शिंदे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

डिजिटल साक्षरतेचा सामर्थ्य घडवून चांगल्या भविष्याची निर्मिती – मा सुरेश शिंदे,

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेऊन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे अभियांत्रिक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास गावाचा डिजिटल विकास अंतर्गत शिवभूमी कल्याण गावात विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच संपन्न झाले, हा उपक्रम ग्रामीण समस्यांशी परिचय करून देण्याचा आणि स्थानिक समुदायाच्या विकासात योगदान देण्याचा हेतू ठेवून राबवला गेला, एन एस एस च्या स्वयंसेवकांनी व्यक्तिगत विकास साधताना डिजिटल साक्षर आणि सशक्त ग्रामीण समाज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक संजय वानखेडे यांनी केले ते कल्याण येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, याप्रसंगी तंत्रज्ञान विकसित सदृढ समाज हेच एनएसएसचे ध्येय असल्याचे प्राचार्य डॉ, डी एस बोरमने यांनी सांगितले, शिबिरामुळे सुसंस्कृत व श्रम संस्काराची जाणीव, विचाराची देवाण-घेवाण गावातील प्रश्नांची जाणीव, लोकसंवाद गावडूयाची प्रक्रिया समजण्यास मदत होते त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम श्रमसंस्कार शिबिर आयुष्यात अमूल्य ग्राम बदल घडून आणण्यात निश्चित उपयोगी ठरतात असे कार्यक्रम अधिकारी डॉ, नाना शेजवळ म्हणाले, या शिबिरात स्वयंसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव, सांडपाणी व्यवस्थापन, लोकशाही बळकट करण्यासाठी मदत कार्ड, किसान कार्ड, शेतकरी ओळखपत्र, शासकीय योजनांची पुस्तिका, संगणक प्रशिक्षण, रोबोट प्रशिक्षण, ड्रोन प्रशिक्षण, आकाशदर्शन, ग्राम स्वच्छता, गावचे संघटन, नेतृत्व, एकात्मता, महिला सबलीकरण, युवक युवती उन्नतीकरण इत्यादी विविध ग्राम विकासाचे उपक्रम राबविले, गावातील स्मशानभूमी, डिजिटल सर्वेक्षण, संरक्षण भिंती, हनुमान आखाडा, ग्राम मंदिर आणि ग्राम पंचायत परिसर आकर्षण रंगरंगोटी व सुशोभीकरण करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला, यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले होते, कल्याण गावची वेबसाईट बनवून जगाच्या पलटावर आले, गावातील पाण्याचे ओढे नाले यांची टौपोग्राफिक सर्वे केला भूजल संवर्धनासाठी व जमिनीचे जल स्तर सुधारण्यासाठी पर्यावरण पूरक पावसाचे पाणी साठवण्यासाठी सतत वळण खंदक सीसीटीची निर्मिती करण्यात आली, ऐतिहासिक स्थळांचे सर्वेक्षण करून प्लास्टिक मुक्त सिंहगड मोहीम हाती घेण्यात आली, कचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी कंपोस्ट पीट तयार करून जनजागृती अभियान राबविण्यात आले होते, गावातील पाझर तलावाचे पाण्याचे जलस्तोत आणि बंधाराच्या साईचे रोटरी क्लब मदतीने सर्वेक्षण करण्यात आले, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, तसेच स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आरोग्य आणि शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूक केले, स्वयंसेवकांनी स्थानिक युवकांसाठी शैक्षणिक गुणवत्ता व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक प्रशिक्षण कल चाचणी गणित व विज्ञान आणि इंग्रजी संवाद कौशल्ये आणि कृषीविषयक विषयासाठी योगदान दिले, गटचर्चा पथनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गावकऱ्यांचे प्रबोधन केले, डॉ माधव बोराटे यांचे थेरी ऑफ चेंज, पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक डॉ संतोष पटणी यांचे अपारंपारिक ऊर्जा, डॉ मोहिते यांनी तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग आणि जगदीश ओव्हाळ यांचे संविधान @ 75 आणि जग बदलणारा बाप माणूस डॉ, डी पी गायकवाड यांचा सायबर क्राईम आणि डिजिटल साक्षरता, अनिल केंगार यांचे भारुडातून समाज प्रबोधन, निलेश पर्वत यांनी 21 व्या शतकातील राष्ट्रीय सेवा योजना, इत्यादी तज्ञांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, सोलर दिवे बसवून अपारंपारिक ऊर्जा वापर करण्यासाठी गावकऱ्यांना जागृती केली,
याप्रसंगी सरपंच राज डिंबळे, उपसरपंच सिताराम डिंबळे,
माजी पंचायत समिती सदस्य मनोहर डिंबळे, ऋषिकेश डिंबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी शिक्षक स्थानिक नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला, कल्याण गावच्या ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी पाणी निवास व्यवस्था, वीज व्यवस्था चोखपणे संभाळले, याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे संस्थेचे सचिव छत्रपती मालोजीराजे, सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते,
तसेच यावेळी समृद्धी सोनवणे, दर्शन शेवाळे, मयूर ठवरे, शिवाजी माने, विवेक माने, अरीहंत उपाध्ये, भक्ती गाडगे, अभिजीत पवार, निलेश पाटोळे या विद्यार्थ्यांनी विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरासाठी परिश्रम घेतले होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातींचे वितरण केले जाते. त्यानंतर उपलब्ध अनुदानानुसार ही विहित नमुन्यातील जाहिरातीची देयके जिल्हा कोषागारात सादर केली जातात. 

Read More »

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link