अजिंक्य महाराष्ट्र म्युझिक सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट…
दिनांक १२/०२/२०२५ माघ पौर्णिमा,वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट’ हा प्रेरणादायी नारा देत माघ पौर्णिमेला श्री मलंगगड उत्सव सुरू केला होता. हाच वारसा पुढे नेत दरवर्षी शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातून शिवसेना नेते उपनेते आणि शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक येतात दरवर्षी माघ पौर्णिमेला श्री मलंगगडावर उत्साहीत पणे उत्सव साजरा करण्यात येतो.
आज माघी पौर्णिमेनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या श्री मलंगगड उत्सवानिमित्त *शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे *मा. खासदार श्री. राजनजी विचारे,ठाणे जिल्हा प्रमुख श्री.केदार दिघे व शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते- विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे* तसेच शिवसैनिकांसमवेत उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले त्यांच्या बरोबर ठाणे, कळवा,येथून सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, जेष्ठ शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. तसेच श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी ‘जय मलंग, श्री मलंग’ या घोषणांनी संपूर्ण मलंग गड परिसर दुमदुमून गेला होता. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. दौलत सरवणकर
