अजिंक्य महाराष्ट्र म्युझिकल सामान्य माणसाचे अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
भोसरी येथे सलोखा सोशल फाउंडेशन यांचे वतीने राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले,माता रमाई आंबेडकर,प्रथम महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा बीबी शेख, पहिल्या महिला साहित्यिक मुक्ता साळवे यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे संतशिरोमणी रोहीदास महाराज, संतशिरोमणी सेवालाल महाराज यांच्या ही जयंतीचे औचित्य साधून भोसरी परिसरातील गरिब गरजू कुटुंबातील १२७ महिलांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सर्व महामातांच्या तसेच संत रोहिदास महाराज,संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी हरिश डोळस यांनी आपल्या भाषणात या देशातील जातीवाद, विषमता वाद नष्ट करावयाचा असेल तर सर्व समाजामधी रोटी बेटीचा व्यवहार झाला पाहिजे समाजा समाजात असणारी विषमता नष्ट करणे ही काळाची गरज आहे आपल्या सर्व संत महात्मेंनी मानवतेचा पुरस्कार केला आहे त्याच महामानवांचे विचार घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे.यावेळी जयभारत कुंभारे,प्रतीभा बनसोडे , यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी शारदा कसबे अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर पॅंथर युवा मोर्चा, मोहसीन शाह संस्थापक अध्यक्ष शाह जमात शान एक फकिर, सामाजिक कार्यकर्ते हरुनभाई शेख, कपिल डोळस, अनिल रोकडे, संजय डोळस, मनिषा कुरकुटे, अनिता डोळस, मनोरमा रोकडे,सविता डोळस अदी उपस्थित होते
