अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रत्तीनिधी शंकर जोग
सेडर चर्च 2025 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न,
इग्नाइट चर्च संघाने प्रथम क्रमांक पटकावला,
सेडर चर्च आयोजित अंतर चर्चेस भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 व 13 2025 रोजी हांडेवाडी येथील सनी इलेव्हन स्पोर्ट्स ग्राउंड येथे भरवण्यात आले होते,
या क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे, मुंबई, दौंड, कुरूडवाडी, येथून 12 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता, दोन दिवस झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण काल संपन्न झाले होते, या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक इग्नायट चर्च या संघाने पटकावला, द्वितीय क्रमांक आर्क बिल्डर्स यांनी पटकावला,
(मॅन ऑफ द मॅच पांडू इग्नाइट चर्च यांनी पटकावला,) उत्कृष्ट फलंदाज अभिजीत मकासरे, मॅन ऑफ द सिरीज आशिष अंतू संघाने पटकावला, शिस्तबद्ध विशेष चषक आगापे चर्च या देण्यात आले होते, सदर बक्षीस वितरण शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद(नाना) भानगिरे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना 2025 सेडर विजय चषक व स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आला,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीटर परमार अध्यक्ष महिला क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य,
अनिल गडकरी सर शिवसेना शिंदे गट शिक्षक शिक्षकेतर पुणे जिल्हा प्रमुख, पास्टर मिलिंद मोरे, शितल कुमार थोरात,
निलेश जगताप शिवसेना शिंदे गट कसबा विधानसभा प्रमुख, उद्योजक स्वराज बाबर, संदेश बोर्डे आदि यावेळी उपस्थित होते,
या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सुनील जाधव, सॅम्युअल नाईकनवरे, रवींद्र व्हासेमनी, आशिष मोरे आदींनी केले,
