अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
मुकुंद कांबळे यांना महाराष्ट्र राज्य समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार प्रामाणिक व महाराष्ट्र राज्य पुरस्कार वितरण सोहळा तर्फे तर्फे मुंबई घाटकोपर रमाबाई नगर शहीद हॉल आज दिनांक9 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेता दिग्दर्शक विजय पाटकर साहेब, अजय तापकीर प्रहार जनशक्ती पक्ष महासंपर्क प्रमुख माननीय. उत्तमराव तरकसे साहेब क्राईम ब्रांच नवी मुंबई, रंजीता पाटील मॅडम अभिनेत्री व नाट्य कलाकार, दिगंबर कोळी अभिनेता व नाट्य कलाकार, राकेश मोहिते राष्ट्रीय बहुजनअधिकारी आशिष सातपुते साहेब जी हास्य सम्राट, अनिताताई पाटोळे घे उंच भरारी संस्थापक, राजू मानकर मार्गदर्शक, विजय भोसले समाजसेवक व सल्लागार यांची उपस्थिती होती. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. म्हणून महाराष्ट्रातून पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोक आली आहेत. डॉ .बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे फक्त समाज करण करण्यात कार्यरत आहे.सह संपादक मुकुंद कांबळे यांना नुकतेच साने गुरुजी जयंती निमित्त
परेल मुंबई येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती ( महाराष्ट्र राज्य),च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून दैनिक युवक आधारचे सह संपादक मुकुंद कांबळे यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे *मा.कुलगुरु तथा माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. मुकुंद कांबळे यांचे सर्व स्तरात कौतुक होते आहे. मुकुंद कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून तरुणांना शिक्षण नोकरी निवडण्यासाठी तरुणांना जागृत करत आहे. विशेष करून आदिवासी भागात असणारे विद्यार्थी व झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला देण्यासाठी कार्यरत आहेत. तरुणांना आपल्या प्रगती करताना येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती मात कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्यांना मदत करत असतात. मुकुंद कांबळे हे समाज सेवा करताना समाजातील बंधूंना कमी उपचारांमध्ये आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल म्हणून मदत करत असतात. आदिवासी भागातील काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे सहकार्य करतात. कोविड काळामध्ये बरेच पेशंटला मोफत ऍम्ब्युलन्स सेवा पुरवली आहे. गोरगरीब गरजूंना घरी घेण्यासाठी व त्याला लागणारे लोन सोप्या पद्धतीने कसे करून देता येईल यावर भर देतात. मुकुंद कांबळे हे दैनिक युवक आधारचे सहसंपादक म्हणून काम करत आहे. दैनिक युवक आधार च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना स्वयम रोजगार मिळवण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवड करत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कामाची दखल घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार प्रमाणित महाराष्ट्र राज्य समाजभूषण गौरव पुरस्कार नवी मुंबई क्राईम ब्रँच उत्तमराव तरकसे प्रहार जनशक्तीचे महाप्रमुख अजय तापकीर साहेब व अभिनेत्री व नाट्य कलाकार रंजीता पाटील अभिनेता व नाट्य कलाकार दिगंबर कोळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर समाजामध्ये काम करताना खूप मोठी जबाबदारी वाढली आहे. समाजामध्ये आयुष्यात खूप जबाबदारीने काम करावे लागेल. असे मत मांडले.
