अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने आरोग्य उपसंचालक यांच्या सोबत सफाई कामगारांचे विविध प्रश्नांच्या विषयी बैठक,
प्रतिनिधी शंकर जोग
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ नवीन प्रशासकीय इमारत विधान भवन पुणे येथे आरोग्य सेवा उपसंचालकांच्या अधिकाऱ्यांसोबत सफाई कामगारांचे विविध प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आले होते यामध्ये मेहतर वाल्मिकी आणि अन्य समाजातील सफाई कर्मचाऱ्यांचे लाड पागे वारसा हक्क प्रलंबित नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली,
तसेच सफाई कामगारांचे नियम शिथिल करण्यात यावे, शासनमार्फत रिक्त पदे वाढवण्यात यावे,
सफाई कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तक्रार निवारण समिती नेमण्यात यावे, आपल्या आरोग्य विभागीय वर्ग चार कामगारांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी त्याकरिता बाहेरील हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचार मिळावा वैद्यकीय पूर्तता व्हावी, सेवा भरती करण्याकरिता सफाई कामगार पदाची भरती करण्यात यावी नियुक्ती झालेले सफाई कर्मचारी यांची जात पडताळणी होते की नाही अशा अनेक विषयांवर चर्चा झाली,
यावेळी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अनुपम बेगी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज लालबिगे, चेतन जेधे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, भारत जाधव महाराष्ट्र प्रदेश सचिव, चंद्रकांत चव्हाण पुणे जिल्हाअध्यक्ष, पंकज खैरे आळंदी शहराध्यक्ष आदि यावेळी उपस्थित होते,
