एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दैनंदिन ताणतणाव दूर होऊन सांघिक भावना वाढीस मदत 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

– अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे

लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा समारोप

 

नागपूर, दि. 9 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जाऊन नवचैतन्याने लोकाभिमुख प्रशासन राबविण्यास सहाय्य होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

लेखा व कोषागारे संचालनालय तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या मैदानावर करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. समारोपप्रसंगी लेखा व कोषागार संचालक दिपाली देशपांडे, स्थानिक निधी लेखा परीक्षा मुंबईचे संचालक निलेश राजुरकर, संचालक वनामती सुवर्णा पांडे, संचालक माधव नागरगोजे, नागपूर येथील लेखा व कोषागार विभागाच्या सहसंचालक ज्योती भोंडे, स्थानिक निधी लेखापरीक्षा नागपूर येथील सहसंचालक गौरी ठाकूर, यांच्यासह लेखा व कोषागार विभागाचे राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे. सर्वांनी विविध माध्यमातून आपले छंद पूर्ण करावे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. त्यासोबत मनालादेखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते. सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून सहभागाचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातील लेखा व कोषागारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

*स्पर्धानिहाय विजेते*

राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कलावंत व खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले. त्यामध्ये सांस्कृतिक स्पर्धेत गायन क्षेत्रात सहभाग घेणाऱ्या महिला (एकल) श्रृती वेपेकर ह्या विजेता तर पुनम कदम ह्या उपविजेता ठरल्या. तसेच पुरूष (एकल) सुमेध खानवीस हे विजेता तर सतीश पारधी उपविजेता ठरले. युगल गायनामध्ये सुमेध कांबळे व संध्या ढोणे ही जोडी विजेता आणि अर्चना पुरणिक व अंकूश नलावडे ही जोडी उपविजेता ठरली. समुह नृत्यमध्ये कोकण विभाग विजेता तर अमरावती विभाग उपविजेता ठरला. सुत्रसंचालनामध्ये स्वरांजली पिंगळे व अक्षय कडळक ही जोडी विजेता तर अश्विनी कुलकर्णी व अनय संघरक्षित ही जोडी उपविजेता ठरली. कार्यक्रमाच्या दिग्दर्शनासाठी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई या विभागाला विजेता घोषित करण्यात आले तर कोकण भवन हा उपविजेता ठरला. रांगोळी स्पर्धा एकलमध्ये यामिनी खरड या विजेता ठरल्या तर नम्रता चव्हाण ह्या उपविजेता ठरल्या. युगलमध्ये अरविंद जाधव, सीमा सावंत, नितिश कदम, सुषमा देशमुख, प्रिया सुर्याजी हे विजेता तर भाग्यश्री बरांगे, वैशाली गंगावणे, रेखा मोहीते, संध्या हाते, स्वाती तारे हे उपविजेता ठरले.

क्रीडा स्पर्धांमध्ये संदिप बाबर हे 200 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम तर निलेश जाधव यांना द्वितीय व शिवाजी पांढरे यांना तृतीय पारितोषीक मिळाले. महिलांमध्ये कलावती गिऱ्हे यांनी प्रथम पारितोषीक पटकावले तसेच विश्रांती पाटील या द्वितीय व दिपाली थोरात या तृतीया स्थानी राहील्या. लांब उडी पुरुषांमध्ये अर्जुन सिरसाट हे प्रथम तर राहुल भोयर यांनी द्वितीय व संकेत दिवटे यांनी तृतीय स्थान पटकावले. महिलांमध्ये विश्रांती पाटील (प्रथम), दिपाली थोरात (द्वितीय) व प्रियंका हरड (तृतीय). थाळीफेक मध्ये महिला रिंकल माळवी (प्रथम), नयना सोलव (द्वितीय) व प्राजक्ता वाकोडे (तृतीय). पुरुषांमध्ये प्रविण बोरकर (प्रथम), विनोद काळे (द्वितीय), पलाश कोहळे (तृतीय). गोळाफेक मध्ये महिला सोनू राठोड (प्रथम), कल्पिता शेंडी (द्वितीय), रूपाली भोसले (तृतीय). पुरुषांमध्ये अनिल राऊत (प्रथम), निलेश लाड (द्वितीय), विनोद काळे (तृतीय). पाच कि.मी चालणे यास्पर्धेत पुरुषांमध्ये मंदार जोशी (प्रथम), संदिप अहिरे (द्वितीय), बळीराम पाटील (तृतीय). तीन कि.मी चालणे या स्पर्धेत महिलांमध्ये वर्षा मानकर (प्रथम), शिल्पा सहारे (द्वितीय), राजश्री मेहेर (तृतीय). 50 मी. पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये जयदेव देशपांडे (प्रथम), संतोश पाटील (द्वितीय), अरविंद वाघमोडे (तृतीय). 100 मी पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये. जयदेव देशपांडे (प्रथम), अमोल कवडे (द्वितीय), संतोष पाटील (तृतीय). कॅरम या स्पर्धेत महिलांमध्ये भाग्यश्री देशपांडे (विजेता) व पूजा होतकर (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत महिला युगलसाठी वैशाली सोनवाने व कविता देशपांडे (विजेता), श्रीमती मनस्वी काळे व श्रीमती क्षितीजा काळे (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये श्री शैलेंद्र भोसले विजेता तर श्री हुकुमचंद बोरूडे उपविजेता ठरले. युगल पुरूषांमध्ये श्री प्रविण पवार व श्री संदिप सावंत हे विजेता तर श्री रोहित मस्के व प्रशांत मते हे उपविजेता ठरले. टेबल टेनिस या स्पर्धेत महिलांमध्ये (सिंगल) श्रीमती चैताली जाधव विजेता तर श्रीमती दिप्ती देशमुख उपविजेता ठरल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिप्ती देशमुख व श्रीमती संध्या मनवर विजेता तर श्रीमती चैताली जाधव व श्रीमती योगिता पवार उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये (सिंगल) श्री प्रितम रामटेक विजेता तर श्री शेखर सुतार उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये श्री प्रितम रामटेक व प्रशांत सावंत विजेता आणि श्री निलेश बारकुर व श्री सर्फराज हे दोघे उपविजेता ठरले. बॅटमिंटन स्पर्धेत महिला (सिंगल) मध्ये श्रीमती दिशा ताकतोडे ह्या विजेता ठरल्या तर श्रीमती ज्योती गायकवाड ह्या उपविजेता राहिल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिशा ताकतोडे व श्रीमती सुलोचना चव्हाण या दोघी विजेता तर श्रीमती स्वराली पिंगळे व श्रीमती ज्योती गायकवाड उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये मयंत केळकर विजेता तर संतोष चाळके उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये मयंक केळकर, योगेश कुमावत ही जोडी विजेता तर मंगेश चहारे व साधनकर ही जोडी उपविजेता ठरली. बुध्दिबळ या स्पर्धेत मंदार पाटील हे विजेता तर किशोर माढास हे उपविजेता ठरले. थ्रो बॉलमध्ये महिला शिल्पा वाकडे उत्कृष्ट खेळाडू तर नागपूर विभाग विजेता संघ ठरला तसेच पुणे विभाग उपविजेता संघ ठरला. शुटींग बॉलमध्ये आबासाहेब घायाळ हे उत्कृष्ट खेळाडू, छत्रपती संभाजी नगर हा संघ विजेता तसेच कोकण विभाग उपविजेता ठरला. खोखो खेळामध्ये संघमित्रा कांबळे हा खेळाडू उत्कृष्ठ ठरला. तर अधिदान व लेखा कार्यालय विजेता ठरले तसेच पुणे विभाग उपविजेता ठरला. क्रिकेट स्पर्धेत कोकण विभाग विजेता ठरला.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link