अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा नागपुर च्यावतीने उत्तर नागपूरमध्ये पार्क रिझर्व असल्या कारणास बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटिल यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली असता मुख्यमंत्री महोदयांनी म्हंटले की, नारा पार्कचा प्रश्न डॉ. मिलींद माने यांचे माध्यमातून कळलेले आहे. मी लवकरच सबंधित विभागाची बैठक बोलावून चर्चा घडवून आणण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी बोलतो आहे. चंदू पाटिल यांनी आंदोलन स्थळाला भेट देण्या विषयी विनंती केली असता मुख्यमंत्री महोदयांनी पालकमंत्री यांना आंदोलन स्थळाला भेट देण्याकरिता कळविण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत अध्यक्ष चंदू पाटील यांना आश्वासन देत नारा पार्क झालेच पाहिजे आम्ही पालकमंत्र्यांना सांगू आणि प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा विकसित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. उत्तर नागपूर हा मागासवर्गीय मतदार संघ असून नारा पार्कच्या माध्यमातून विकास आणि रोजगारांच्या संधी मिळू शकते. जर नारा पार्क विकसित झाले तर अनेक गोरगरिबांना रोजगार मिळेल असे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. याप्रसंगी शिष्टमंडळात ॲड. शैलेश नारनवरे, गौतम पाटिल, दिलीप तांदळे, शाशिताई चालखुरे, येमुनाबाई रामटेके, रेखाताई खोब्रागडे, वानिता वालदे, अजय खोब्रागडे, अल्का रक्षित, विजया पाटील इत्यादी सभासदांची उपस्थिती होती.
