अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
हिंगणा तालुक्यातील कवडस येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर, दि. 7 : आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना व उपक्रम राबवित आहेत. याअनुषंगाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अनुषंगाने आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज्यमंत्री श्री. नाईक यांनी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. यावेळी संपत्ती तोडासे, संदीप मसराम, नेहा वाघदरे, दिव्या कोराम, कृष्णा जाधव, प्रफुल सयाम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्यमंत्री श्री. नाईक यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
****
