अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एक सामान्य माणसाचे अनेक सुरुवात
राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली,
सौ. कलावती गवळी (नांदेड जिल्हा ) प्रतिनिधी.
केवळ महिन्याभरांत तिसरी बदली अनुभवणाऱ्या नवी मुंबई सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक पदावरून नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती दिलेल्या राहुल कर्डिले यांनी 6 फेब्रुवारी रोजी आपला पदभार मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून स्वीकारला आहे, राज्य शासनाने मंगळवारी नांदेड नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली होती, कर्डिले हे 6 फेब्रुवारी रोजी मुंबईहून नांदेडमध्ये दाखल झाले होते, प्रथम सत्रात त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर सहाय्यक, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती, तर नांदेड जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची आता छत्रपती संभाजीनगर येथे ते वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते, सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत, राहुल कर्डिले यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी तर चंद्रपूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्धा जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे, तसेच सिंडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदीं पदे त्यांनी भूषविली आहेत, तर मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर सहाय्यक आयुक्त पदावर बदली झाली आहे, अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील आपल्या कार्यकालमध्ये सुध्दा लोकसभा पोटनिवडणुका, आणि विधानसभा निवडणुका यशस्वी करून नांदेड जिल्ह्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम यशस्वीरित्या त्यांनी केले आहे, नांदेड जिल्ह्यात त्यांचा जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट कार्यकाल ठरला,*
