अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतिष कडू
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना व बंद्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना
ई-मुलाखत,बाबत समुपदेशन/मार्गदर्शन.
दिनांक ०५फेब्रुवारी २०२५
————————————————————–
मा. श्री प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना व बंद्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना ई-मुलाखत (व्हिडिओ) भेटी बाबत प्रत्यक्ष बंदी निहाय सर्कल ला भेट देऊन विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कारागृहाच्या बाहेर बंद्यांना भेटण्यासाठी आलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांना ई-मुलाखत (व्हिडिओ) भेटी बाबत प्रत्यक्ष भेटून विस्तृतपणे समुपदेशन / मार्गदर्शन करण्यात आले सोबत आलेल्या वकिलांना मार्गदर्शन करण्यात आले. ई-मुलाखतीच्या (व्हिडिओ) वापर कशा करावा याबाबत विस्तृतपणे माहिती / मार्गदर्शन दरम्यान त्यात सर्व प्रथम गुगल वर e-Prison search करावे त्यानंतर स्क्रीन वर https:eprisons.nic.in अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे. त्यानंतर वरच्या बाजूला emulakat वर क्लिक करावे त्यानंतर डाव्याबाजूला असलेल्याला Visitor Details या बॉक्स मध्ये बंद्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनी किंवा वकीलानी त्यांची स्वतःची माहिती अचूकपणे भरायची आहे, यामध्ये Identity Proof निवडतांना फक्त आधार कार्ड निवडावे आणि समोरच्या रकाण्यात मध्ये आधार कार्ड नंबर अचूक पणे टाकावा खाली ई-मेल आय-डी आणि मोबाईल नंबर अचूकपणे टाकावा यावरच तुमचा OTP येणार आहे. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या To Meet या बॉक्स मध्ये बंद्यांची माहिती अचूक पणे भरावी, ज्या तारखेला भेट पाहिजे आहे ती तारीख टाकावी, खाली Visit Mode मधून Video Conferencing हा option निवडावा खाली कैप्चा कोड (Captcha Code) अचूक टाकून सबमिट करावे, त्यानंतर नातेवाईकांच्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी वर एक OTP येईल तो टाकून OK करावे. त्यानंतर स्क्रीन वर visist reference नंबर येईल, तो तुमच्या कडे लिहून ठेवावा. तसेच तुमच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेल आयडी वर V.C. भेट दिनांक व वेळ माहिती प्राप्त होईल त्यानंतर कारागृह प्रशासनाने VC request स्वीकारल्यानंतर नातेवाईकांच्या ई-मेल वर किंवा मोबाईल क्रमांकावर VC भेटीच्या दिनांक येईल व वरील प्रक्रिया झाल्यानंतरच ई- मुलाखत होईल अशी माहिती बंदी व बंद्यांच्या नातेवाईकांना नागपूर मध्यवर्ती कारागृह मार्फत प्रत्यक्ष मार्गदशन, समुपदेशन करण्यात आले.आता ई- मुलाखत द्वारे बंद्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना व वकिलांना कारागृहातील बंद्यांना भेटता येते, शिक्षाधिन बंद्यांना महिन्यातून दोन वेळा व न्यायाधीन बंद्यांना आठवड्यातून एक वेळा भेटता येते, त्यासाठी ई-मुलाखतीची सेवा सुरु करण्यात आलेली आहे. ई- मुलाखत सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांना त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना, तसेच वकिलांना व्ही.सी.द्वारे भेटता येते. आणि बंद्यांच्या नातेवाईकांना ई- मुलाखतीमुळे येण्या-जाण्याचा खर्च आणि वेळ वाचत आहे त्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांनी या सेवेचा फायदा घेणे बाबत मा. वैभव आगे, अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर यांनी आव्हान केले यावेळी मा. दिपा वै. आगे, अतिरिक्त अधीक्षक, मा. श्रीधर काळे, उप-अधीक्षक, मा. आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगअधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मीना लाटकर, क्रिष्णा पाडवी, धनपाल मेश्राम उपस्थित होते.
स्वाक्षरीत /-
(वैभव सु.आगे)
अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारगृह, नागपूर
