अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना*
नागपूर,दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथून बोधगया येथे २३६ नागरिक आज विशेष रेल्वेने रवाना झाले.
आज रात्री नागपूर येथील मुख्य रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे रवाना होणार झाली. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली.
रवाना होण्यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दूरध्वनीवरून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नागपूर येथून हे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत.
