पाय काढलेल्या दीव्यांगाच्या घरी जाऊन मधु तारा ने केले कुबड्या वाटप
संपादक संतोष लांडे
दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी 13 ताडीवाला रोड भिम संघटना तरुण मंडळ नदी किनार पुणे येथील रहिवासी मालधक्का पुणे येथील हमाली काम करणाऱ्या श्री संजय साबळे यांचा गेंग्रिन मुळे पाय कट केला असता त्यांना त्यांच्या घरी जाऊन कुबड्या वाटप केल्या.
मधु तारा पुणे दिव्यांग विभागाच्या पुणे शहराध्यक्षा मीनाक्षीताई शिंदे यांच्या सहकार्याने या कुबड्या उपलब्ध झाल्या.मधु तारा सोबती रिक्षा चालक श्री महेबुब शेख यांनी श्री साबळे यांना कुबड्या वाटप व्हावे म्हणून विनंती केली होती.या वेळी मधु तारा राज्यभरात दिव्यांगना घरी जाऊन सेवा देते याचा अभिमान वाटतो असे श्री महेबुब शेख म्हणाले.या वेळी श्री संजय साबळे यांना घरी येऊन मधु ताराने कुबड्या दिल्या बद्दल आनंदाश्रू अनावर झाले.
या वेळी दिव्यागांची सेवा आमच्या हातून घडत आहे हे आमचे भाग्यच असे मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे म्हणाले व या वेळी कुबड्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मधु तारा शहराध्यक्षा मीनाक्षीताई शिंदे व श्री संजय साबळे यांच्या पर्यंत कुबड्या पोहोचवावे अशी विनंती करणाऱ्या मधु तारा सोबती रिक्षा चालक श्री महेबुब शेख यांचे आभार मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी मानले.
