अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश दळवी
दिनांक ०४/०२/२०२५ रोजी सायंकाळी हळदीकुंकू संभारंभ आणि विभागातील जेष्ठ व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि भव्य लकी ड्रा , मा. आदरणीय सौ रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये स्थळ गोदुताई परुळेकर मैदान, तीन पाण्याची टाकी जवळ, सिद्धेश्वर तलाव,ठाणे येथे दणक्यात पार पडला. आणि विशेष उधळू रंग स्वरांचे हा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला सर्व कार्यक्रमास योगदान मा.खासदार श्री. राजनजी विचारे, आणि सौ. नंदिनी राजन विचारे, मंदार विचारे यांनी दिले.कार्यक्रम दरम्यान २५ महिला रिक्षा चालक आणि ६५ महिला बस कंडक्टर यांचा सत्कार मा. सौ. रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमती. रेखाताई खोपकर, सौ.समिधाताई मोहिते, सौ महेश्वरी तरे,ऍड. आकांक्षा राणे, श्रीमती. संपदा पांचाळ, सौ. स्मिताताई इंदुलकर, सौ. वासंती राऊत, सौ. प्रमिला भांगे, श्रीमती. मंजिरी ढमाले, सौ. संगीता साळवी, सौ. विद्या कदम, सौ. नीलिमाताई शिंदे,श्रीमती.सुनंदा देशपांडे, सौ. पुष्पलता भानुशाली,सौ. संध्या दिघे, सौ. छाया अरमृगम, सौ. भारती शिवणेकर, सौ. अर्चना बागवे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे येथील वरिष्ठ पदाधिकारी, यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येवून कार्यक्रम नियोजना प्रमाणे छान प्रकारे पार पडला त्यामुळे सहभागी समस्त महिलाआघाडी सर्व शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी, शिवसैनिक , युवा सेना व युवती सेना पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माझी शिवसैनिक या सर्वांचे मा.खासदार श्री. राजनजी विचारे, आणि सौ. नंदिनी राजन विचारे, मंदार विचारे मनापासून आभार व्यक्त केले.
