अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी स्वप्निल एरंडोल
एरंडोल पारोळा भडगांव चे नवनिर्वाचित आमदार श्री.अमोलदादा चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ” बाप समजून घेतांना ” या विषयावर वसंत हंकारे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आले होते.बाप समजून घेताना ” या विषयावर श्री वसंत हंकारे यांचे अनेक व्याख्यान झालेली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .आपल्या जीवनात आई-वडील आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव या व्याख्यानातून झाले दिसून येते.
याप्रसंगी एरंडोल तालुक्यासह एरंडोल शहर व परिसरातील नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी त्यांचे पालक व पंचक्रोशीतील सर्व तरुण वर्ग यांनी या व्याख्यानमालेत हजारोंच्या संख्येने विद्यालयाच्या पटांगणावर हजेरी लावली एरंडोल शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या जनसंख्येने या व्याख्यानमालेला लोकांची उपस्थिती झालेली दिसून आली.
सध्याच्या युगात आईच्या यातना व बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आई-वडिलांचा श्वास नेहमी हदयात ठेवावा. मुलगा किंवा मुलीचे वाकडे पाऊल पडले, तर अंत्यसंस्काराच्या चितेवर जाण्यापूर्वीच बापाची घरात आणि मनात रोजच चिता जळत असते, असे विचार प्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
डॉ. हंकारे यांचा भावनिक व हृदयस्पर्शी संवादावेळी उपस्थित सर्वांच्याच अश्रूचा बांध फुटला.
शिवसेना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील व मित्रपरिवार शिवसेनेचे सर्व पदाधिका-यांनी ही व्याख्या मला आयोजित केली होती त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.
