अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज परभणी गोपाळ भालेराव
भोसरी येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा गुळवे वस्ती भोसरी शालेय समितीच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी आश्रमशाळेतील मुलांच्या कलागुणांची वाढ व्हावी, त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी. यासाठी चित्रकला, निंबध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे चित्रकला प्रथम क्रमांक विशाल डुकळे, रूपाली चव्हाण, राहूल मोहिते. निबंध स्पर्धा प्रधम क्रमांक काजल मोहिते, रेवती सोनकर, सुरज गौतम. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक मानसी मोरे, सोनाली राठोड, अश्विनी पवार या सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र जेष्ठ साहित्यिक राजन लाखे व नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या शुभहस्ते देण्यात आले या स्पर्धेचे आयोजन शाळेचे शालेय समिती अध्यक्ष जीवन माने, संस्थापक/ संचालक संदीप राक्षे, मुख्याध्यापक शरद खोपडे, गोरख शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारूती कदम यांनी केले होते..
