अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश तळेकर
ग्रंथसंचलनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवात ते बोलत होते.
कृष्णात खोत यांना दोन वर्षापूर्वीच “रिंगाण ” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या गावठाण, धूळमाती,रौंदाळा, रिंगाण, झडझिंबड, काळयामाळया भिंगोळया या कादंब-या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
“लेखक आपल्या भेटीला ” या कार्यक्रमाअंतर्गत कवी विजय सावंत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते.
“लेखकाने गोंगाटात शांतता शोधायला हवी.शांततेला आवाज देता यायला हवा.सर्व सामान्य माणूस परीघावरून केंद्रात यायला हवा, त्याच्या व्यथा, वेदना, दुःख यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या कादंब-यातून केलेला.कारण हीच माझी माणसं आहेत, तीच समाज व्यवस्थेचा कणा आहेत.असेही खोत म्हणाले
