अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोपाळ भालेराव देहू
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ह. भ. प. शिरीष महाराज मोरे वय 30 वर्षे यांचा मृत्यू झाला. त्यांनी आज राहत्या घरात गळफास घेत स्वतःचा जीव संपल्याची माहिती समोर आली. शिरीष मोरे यांनी टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र या घटनेने तीर्थक्षेत्र देहुगावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचे नाव सर्वत्र लौकिक आहे त्यामध्ये दुरदैवाची बाब म्हणजेच. शिरीष महाराज मोरे यांचा विवाह ठरला होता.तसेच टिळासुद्धा झाला होता. या घटनेने देहू परिसरात शोककळा पसरली आहे अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेलं नाही.
