अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शालेय समितीच्या अध्यक्षपदी लोदवाळ यांची निवड
भारज प्रतिनिधी राजेश दामधर
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी येथील प्राथामिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे येथील एकूण 8 वर्गातील अनुक्रमे पहिली ते आठवी पर्यंत प्रत्येक पालकांमधून एक सदस्य स्त्री – पुरुष समानतेनुसार सर्वांनुमते शालेय ववस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रीमान भगतसिंग गेंदूसिंग लोदवाळ तर उपाध्यक्ष म्हणून सौ. राजश्री भारत नरवाडे यांची निवड करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून सर्वश्री बजरंग मानसिंग कायटे, श्री रामेश्वर ईश्वरसिंग ताटू , सौ . कमल रमेश रावळकर , श्री गणेश प्रल्हाद बारवाल , सौ . छाया संतोष रावळकर , सौ. आशा अरविंद गवई यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे यावेळी मुख्याधापक श्री धनावत यांनी सचिव म्हणून काम पाहिले येथे समिती खेळीमेळीच्या वातावरणात स्थापन करण्यात आली आहे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सदस्य झालेल्या पदाधिकऱ्यांचे सरपंच , उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक व गावकऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत .
