अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज भारज प्रतिनिधी राजेश दामधर
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे त्या निमित्ताने सपनाहाच्या सहाव्या दिवशी भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील नवचैतन्य व्यसन मुक्ती केंद्राचे मसीहा ह.भ.प. श्रीमान ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर यांच्या किर्तन सेवा आयोजित केली होती ते महाराष्ट्र राज्य भर उत्कृष्ट किर्तन , प्रवचन , भगवतगीता वाचन करून समाज प्रबोधन करित असतात तसेच भारज येथे त्यांचे अनेक वर्षापासून किर्तन होत असते किर्तन सेवेत ते पूढे म्हणाले की मानवाला तीन प्रकारचे फळ मिळत असतात त्यापैकी जर माणसाला संताची संगत लाभली तर त्या व्यक्तीला उत्तम फळ मिळाल्या शिवाय राहत नाही त्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज , संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग घेऊन अनेक प्रकारचे दृष्टांत दिले आहे ते त्यांच्या आई – वडिलांची सेवा खुप चांगल्या प्रकारे करतात म्हणून त्यांनी आई – वडिल हे आपले खरे दैवत आहे त्यांची सेवा करा , राष्ट्र सेवा करा , माणसाने माणसावर प्रेम करा , कोणाचे वाईट करू नका , चुगली करू नका असे अनेक उदारणे दिली त्यांनी दिड तासाच्या किर्तनातुन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले होते . यावेळी त्यांच्या समवेत उत्कृष्ट तबला वादक , गायक , टाळ वादक यांनीही खुप छान प्रतिसाद दिला तर गावातील अनेक माता – भगिनींनी आणि पुरुष मंडळींनी शांततेत किर्तनाचा लाभ घेतला तसेच गावतील काहि प्रतिष्ठीत मंडळींनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
