अजिंक्य महाराष्ट्र नेव एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
विधीसंघषर्षीत बालकांकडुन २ दुचाकी गाड्या जप्त करुन वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस
संपादक संतोष लांडे
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना चाहन चोरीचे गुन्हे उघउकीस आणणेबाबच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरांचा शोध घेत असताना बाबर डेअरी जवळ आले असता त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३-२ या गुन्हयातील चोरी गेले स्प्लेंन्डर दुचाकी गाडी क्रमांक MH12LF4556 हिचेसह मिळुन आल्याने त्यांचेकडुन दुचाकी गाडी जप्त करुन गाडी जप्त करण्यात आली आहे.
चालकांकडे अधिक तपास करता त्यांचेकडुन एक हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन ही दुचाकी गाडी क्रमांक MH12EW6570 ही चोरी केल्याचे निष्पन्न झाली ती गाडी जप्त करण्यात आली असुन सदर गाडीबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.
