अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोरी करणा-या दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या, त्यांचेकडुन ०५ मोटार सायकली व ०२ घरफोडीच्या गुन्हयातील दोन लॅपटॉप व एक कॅमेरा केला जप्त.
सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातुन व सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मा. संभाजी कदम साो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाहन चोरीच्या अनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार वाहन चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेणे साठी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील सी सी टि व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, पोलीस अंमलदार सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे चोरीची एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी घेवुन नवले बीज येथे येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन निकम सहायक पोलीस निरीक्षक, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी आम्ही मा. वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करता दोन इसम हे एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी घेवुन दोन इसम संशयीतरित्या नवले ब्रीज कडुन वडगाव चे दिशेने येत असताना दिसले असता, त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने पकडुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव (१) सोपान रमेश तोंडे वय-२७ वर्षे रा.मुळ-मु. पो. खोचरे बेलावडे ता. मुळशी जि.पुणे सध्या रा. साईनाथ वसाहत स्मशानभूमि जवळ, ग.नं.१ शास्त्रीनगर कोथरुड पुणे. (२) आकाश सुनिल नाकाडे वय २९ वर्षे रा. मुळ सुभाषनगर चाळ १४ बार्शी जि.पुणे सध्या रा. नाईकआळी भैरवनाथ मंदिर जवळ, फ्लॅट नं.७ धायरी गाव पुणे. असे असल्याचे सांगितले
