अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दौलत सरवणकर
सध्याची भारतीय उपखंडातील देशांची स्थितीपाहता स्वायत्तमहाराष्ट्र होणे फार गरजेचे आहे अन्यथा येत्या काळात जगभरातून निर्वासित पोटापाण्यासाठी नवीन देश नवी ठिकाणे शोधत स्थलांतर करणार आहेत अशावेळी भारत नावाच्या बहुभाषिक देशात या उपखंडातून आलेल्या लोकांना वेगळं काढणे फार अवघड होणार आहे कारण पाकिस्तानचा मुसलमान पंजाबी, उर्दू, सिंधी आहे, बांग्लादेशचा मुसलमान बंगाली आहे, म्यानमार चे नेपाळचे मुसलमान ईशान्येकडील लोकांसारखे दिसतात हे सगळे भारतातील विविध राज्यात प्रवेश घेऊन सहज महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासोबत इतर राज्यातील लोंढे सुद्धा येतातच आहेत. इथली समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, भाषा संस्कृती, राजकारण या बाहेरून आलेल्या लोकांमुळे प्रभावित झाली आहे म्हणून महाराष्ट्राचे राज्य स्थापनेपासूनचे अधिवासधोरण, व्हिसा आणि स्थलांतरप्रतिबंध कायदे होणे गरजेचे आहे तरच आपण यांना मराठी आणि अमराठी असे वर्गीकरण करून सहज रोखू शकू. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी हरकत नाही पण महाराष्ट्राची मराठी भाषिक राज्य ही ओळख टिकवायची असेल तर मराठी म्हणून विचार करणे व मराठी हिताचे नवे कायदे बनवण्यासाठी तशी पावले उचलणे गरजेचे आहे. कारण २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मराठी भाषिक ६०% आणि परप्रांतीय ४०% होते आता १३ वर्षात ते ५०% च्या जवळपास नक्कीच पोहचले असणार. आपली महत्वाची शहरे तर केव्हाच यांनी काबीज केली आहेत उर्वरित ग्रामीण भागात संख्या लक्षणीय वाढली आहे. याचा तोटा फक्त सामान्य जनतेलाच नाही तर इथले राजकारणी, साहित्यिक, कलाकार, खेळाडू सर्वांनाच होणार आहे आणि म्हणून सर्वांनी एकजुटीने स्वायत्त महाराष्ट्राची हाक देण्याची गरज आहे.याच विषयाला अनुसरून मराठीच्या हक्कासाठी,महाराष्ट्राच्या हितासाठी आज गुरुवार दिनांक:- ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत आझाद मैदान मुंबई येथे एक लोक चळवळ असलेल्या स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत यांच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.जय शिवराय!जय महाराष्ट्र!मी मराठी!
आम्ही सुरुवात केली आहे आता तुम्ही लवकरात लवकर यात सहभागी होऊन हे अभियान महाराष्ट्रातील घराघरात पोहचवणे गरजेचे आहे.
मुंबईसह-महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियो.प्रणित महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि. मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण.
होय……..आम्ही महाराष्ट्राचे …..
