अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कड
नागपूर, दि. 30 जानेवारी 2025: हुतात्मा दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरिता महावितरणतर्फ़े दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह सह मुख्य औद्योगिल संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, यांच्यासह अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
