अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी शंकर जोग
श्री प्रसाद फाउंडेशनचे संस्थापिका, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा सुवर्णा आनंद माने यांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सिंगापूर मध्ये नवव्या शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना व मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले होते यावेळी आयोजक शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार, शब्द परिवाराचे उपाध्यक्ष शशी डंबारे, मुंबई हायकोर्टाचे एडवोकेट सतीश बोलूरकर, प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत, आदि यावेळी उपस्थित होते
