अजिंक्य महाराष्ट्र म्हणजे काय सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय
(पुणे शहर) हडपसर पोलीस ठाणेचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले साहेबांचे जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत… मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यात साताऱ्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या नियुक्तीमुळे हडपसर पोलीस ठाण्याला पुन्हा खमक्या अधिकारी मिळाला आहे, पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात त्यांनी आत्तापर्यंत उत्कृंष्ट सेवा दिली आहे, हडपसर पोलीस ठाण्याचे आजपर्यंतचे सर्वच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे हडपसर पोलीस ठाणेत नेहमीच प्रयत्नशील राहिले, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशावरून पुणे शहर पोलीस दलात नेहमीच बदल्यांचा सिलसिला सुरू असतो, आठ दिवसांपूर्वीच पुणे शहर पोलीस दलात चांगलाच फेरबदल झाला होता, यामध्येच पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची बदली करण्यात आली होती, यांच्या रिक्त जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांची हडपसर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली असून, त्यांनी आदरणीय पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशावरून हडपसर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारून आपल्या कामकाजास प्रारंभ केला आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना ओळखले जाते, मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. संजय मोगले यांच्या कुटुंबाला देखील पोलीस वर्दींची परंपरा आहे,
