अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारच्या रेस्ट हाऊसमध्ये नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटलांचा मुक्काम, सातारकर अजूनही पाहतायत डूडी आणि आँचल दलाल यांचे नाव, सातारा जिल्हा (सौ. कलावती गवळी ) प्रतिनिधी. सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून मात्र सातारच्या शासकीय बंगल्यावर मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि त्यांच्या पत्नी आयपीएस अधिकारी आँचल दलाल यांचे नाव अजूनही सातारकर पाहत आहेत, मात्र नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संतोष पाटलांचा मुक्काम मात्र सध्या सातारच्या रेस्ट हाऊस मध्ये आहे,
तसेच सातारा जिल्ह्यात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची साताऱ्यातून बदली झाली असूनही त्यांचे हे नाव शासकीय बंगल्यावर दिसून येत आहे, हे दोन्ही संविधानिक पदावर असणारे व्यक्ती पती-पत्नी आहेत, साताऱ्यात कार्यरत असताना शासकीय बंगल्यावर दोन्ही एकत्रित राहत होते, पण त्यांना शासनाचा पगार, भत्ता, बाकी सर्व खर्च वेगवेगळ्या पद्धतीने शासन देत होते, त्यामुळे त्यांनी खरंतर वेगवेगळे राहायचे होते, पण तसे काही झालेले नाही
सातारा शहरांमध्ये त्यांना जो शासकीय बंगला राहण्यास दिला होता, तो त्यांनी त्यांची बदली झाल्यानंतर ही रिकामा करून दिलेला नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आलेले नवनियुक्त जिल्हाधिकारी संतोष पाटलांना सध्या सातारच्या रेस्ट हाऊस मध्ये राहावे लागत आहे.
त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल मॅडम यांनी लवकरात लवकर तो शासकीय बंगला लवकरात लवकर रिकामा करून शासनाला परत द्यावा. मात्र या गोष्टीची अजूनही शासनाला देखील जाग आली नाही असेही म्हणण्यात काय वावगे ठरणार नाही, त्यामुळे
या गोष्टीची शासनाने तात्काळ दखल घ्यावी. आणि शासकीय बंगल्यावर सातारच्या नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नावाची पाटी लवकरात लवकर लागावी,
