अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी किशोर गुडेकर मुंबई
भ्रष्टाचाराविरोधात दिनांक २७ जानेवारी २०२५
पासून ७ दिवसांचे लाक्षणिक उपोषण
जनकल्याण दहिसर एसआरए सह. गृह संस्था. शांतीनगर एस. व्ही. रोड दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८ येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत म्हाडा, एसआरए अधिकारी आणि विकासक हयांच्या संगनमताने कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार माहिती देऊनही अधिकारी वर्ग याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे. यामुळे शेकडो गोरगरीब जनतेला आपल्या हक्काच्या घरापासून बंचित रहावे लागत आहे. ही माहिती देण्याकरिता दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आले. तसेच या विषयी तात्काळ चौकशी होऊन भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आझाद मैदान, मुंबई ४०००१ येथे
दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून ७ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गेल्या चार, पाच वर्षापासून एस. व्ही. रोड, शांतीनगर डोंगरी, दहिसर पूर्व, मुंबई-६८ येथील जनकल्याण (दहिसर) एसआरए सह. गृह संस्था हया नावाने सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडी धारकांच्यावर अन्याय करून त्यांना बेघर केले जात आहे. परिशिष्ट-२ मधील अपात्र असलेल्या झोपडीधारका जवळ पुरावे असताना देखील पात्र केले जात नाही. याबाबत माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून हे निदर्शनास आले की, म्हाडा, एसआरए अधिकारी आणि
विकासक हयांच्या संगणमताने जनकल्याण दहिसर एसआरए सह, गृह संस्थेच्या नावाने सुरू आसलेल्या पुनर्विकासात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे (केला आहे) हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी संबंधित परिसरात बॅनरद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र याकडेही शासन प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. १. एस.व्ही. रोड, शांतीनगर डोंगरी, दहिसर पुर्व, मुंबई-६८ जनकल्याण दहिसर, एसआरए सह. गृह संस्थेच्या नावाने सुरू असलेल्या झोपु योजनेत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची शासनाने दखल घेऊन चौकशी करावी.
२. ज्या झोपडीधारकांना अपात्र केलेले आहे त्यांना महाराष्ट्र शासन गृहविभाग, शासन निर्णय क्रमांक झोपुप्र-०८१०/प.क्र.९६/२०१८ झोपु-१, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक १६ मे २०१८ च्या आदेशाने पात्र करण्यात यावेत. 3. दिनांक १६ मे २०१८ चे परिपत्रक प्रमाणे फॉर्म-३ भरून देखील दखल न घेणाया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
४. विकासकाने मा. उपजिल्हाधिकारी झो. पु. यांना परिशिष्ट-२ मधील पात्र-अपात्र झोपडपट्टी धारकांच्या व्यतिरिक्त सादर केलेल्या ५५० ते ६०० बोगस करारनाम्याची चौकशी करावी.
५. जनकल्याण दहिसर, एसआरए सह. गृह संस्था पुनर्विकास योजनेत परिशिष्ट-२ हे वेगवेगळे असतानादेखील विकासकाने योजना वेगवेगळ्या न राबविता ती एकत्रित करून रबविण्याचा मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी (प्रकल्प १ दिनांक १८/०७/२००६) रोजीचे परिशिष्ट-२ एकूण पात्र अपात्र ७९७, १२ हजार २५ स्के. मि. प्रकल्प-२ दिनांक ०७/१२/२००६ परिशिष्ट-२ एकूण पात्र-अपात्र १७०५, २६ हजार स्के.मि.
६. विकासकाने अपात्र झोपडपट्टी धारकांच्या सदनिका एकूण २९४ एस. आर. ए. प्राधिकरणास हस्तांतरीत केलेल्या नाहीत त्या तात्काळ एस. आर. ए. प्राधिकरणास हस्तांतरीत करण्यात याव्या,
७. विकासक झोपडीधारकांचे भाडे देखील वेळेवर देत नाही किंवा देतच नाही. तरीपण पार्ट-२ मधील इमारत क्र. ३ व ५च्या इमारतींना O.C. व C.C. दिली नसताना देखील लॉटरी पद्धतीने दिनांक २९/०८/२०२४ रोजी ९६४ घरांची सोडत काढण्यात आली. ह्याची सुद्धा चौकशी करावी.
८. विकासकाने रिहार्ब इमारतीत स्वतः साठी अधिक बांधलेल्या ३५० ते ४०० सदनिका ताब्यात घ्याव्यात
९. सी.सी.प्रमाणे सादर केलेल्या ॲपोर्ड प्लान न पाहता L.I.O. देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे
१०. म्हाडा, एसआरए अधिकारी आणि विकासक यांच्या संगणपताने करण्यात आलेल्या मनमानी पद्धतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
यासाठी मी राजेंद्र आनंद पवार, आझाद मैदान, मुंबई-१ येथे सात दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बाबतीत यंत्रणेने तातडीने कारवाई न केल्यास , उपोषण दरम्यान माझे काही बरेवाईट झाल्यास ह्याची जबाबदारी या सर्व संबंधित यंत्रणेवर राहील.असे राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.
