अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने असर 2024 चा अहवाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी गणित विषयाच्या संपादणूकीमध्ये राज्यांत सातारा जिल्हा हा अव्वल ठरला आहे, तर भाषा विषयांच्या संपादणूकीमध्ये राज्यांत द्वितीय क्रमांकावर सातारा आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हे असर- ॲन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्स चे सर्वेक्षण दर दोन वर्षांनी करते. सदरचे सर्वेक्षण हे पूर्णतः बाह्य यंत्रणेमार्फत केले जाते. प्रथम ने 2024 चा असर अहवाल आज जाहीर केला आहे. त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीच्या भाषेमध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 50.3 असून सातारा जिल्ह्याची सरासरी संपादणूक 79.3 आहे तर इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपन्न 46.2 असून सातारा राज्यात अव्वल असून सरासरी संपादणूक 84.7 आहे.
इयत्ता सहावी ते आठवीच्या भाषा विषयाची महाराष्ट्राची सरासरी संपादनूक 69.4 असून साताऱ्याची सरासरी 90.4 आहे तर गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 35.4 एवढी असून सातारा गणितामध्ये राज्यांत अव्वल असून सरासरी संपादणूक 63.5 इतकी आहे.
असर 2022 मध्ये महाराष्ट्रात सरासरी संपादणूकीमध्ये सातारा इयत्ता तिसरी ते पाचवीच्या भाषेत आणि गणितामध्ये 8 व्या क्रमांकावर, इयत्ता सहावी ते आठवीच्या भाषा विषयांच्या सरासरी संपादणूकीमध्ये महाराष्ट्रांत सातारा 5 व्या स्थानी तर गणितात 8 व्या स्थानी होता.
गेल्या वर्षापासून राबविलेल्या आदर्श शाळा उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती झाल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासूनच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणीचे नियोजन केले. त्यानुसार एकूण 16 अभ्यास गटांची निर्मिती करून त्यांच्यामार्फत उपक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामधील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली. या कार्यक्रमांतर्गत गुढीपाडवा पट वाढवा, इयत्ता चौथी व इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग, यशवंत प्रयोगशाळा सक्षमीकरण, ज्ञानचक्षु वाचनालय सक्षमीकरण, परसबाग निर्मिती,आनंददायी अभ्यासक्रम निर्मिती या उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे असर 2024 मध्ये सातारा जिल्ह्याने राज्यांमध्ये अव्वल कामगिरी केली आहे.
सातारा जिल्ह्याने आदर्श शाळा उपक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, सर्व अधिकारी व डायट यांनी संघटितपणे कार्य केल्याने असर 2024 मध्ये सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
श्रीम. याशनी नागराजन (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
