अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
खेड तालुक्यातील शिरोली गावचे माजी सरपंच व अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री. नारायणभाऊ शिंदे यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करून, तसेच याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांनी आपला वाढदिवस पिंपरी बुद्रुक येथील निर्मल बाल संगोपन संस्था या अनाथ आश्रम मध्ये सहपरिवार समवेत जावून खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने त्यांनी अनाथ मुलांसोबत वाढदिवस त्यांनी आपल्या कुटुंबा समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मुलांना वह्या, पेन व त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. त्याचबरोबर श्री.नारायणभाऊ शिंदे यांनी कुटुंबासोबत मुलांबरोबर खूप मनमुराद गप्पा मारून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. गीता मॅडम तसेच श्रीमती.गायकवाड मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
