अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शंकर जोग पुणे
26 जानेवारी प्रजासत्ताकदिन व माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गंज पेठ पुणे येथील महात्मा फुले वाडा समता भूमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 250 विद्यार्थ्यांचा सहभाग होता,
यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, मेडल, पॅड, रंगपेटी आदींचे बक्षीस वितरण शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी सर यांच्या हस्ते करण्यात आले होते,
यावेळी प्रमुख पाहुणे गौरव साइन कर उपशहर प्रमुख शिवसेना, रेड हाऊस फाउंडेशनचे ऋषिकेश नवले, उद्योजक निखिल चाबुकस्वार,
पवित्र नाम देवालय कार्याध्यक्ष अविनाश सूर्यवंशी, शिवसेना शिंदे गटाचे कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, समन्वयक आकाश गायकवाड, उपविभाग प्रमुख सागर घोलप, कसबा विभाग संघटक अतुल कच्छावे, विभाग प्रमुख संतोष कांबळे, या स्पर्धेचे परीक्षक राहुल वाघमारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
