अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुदाम येवले
अखिल भारतीय मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने पुणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले होते यामध्ये शिवाजी म्हस्के यांची राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली तसेच चंद्रकांत किसन चव्हाण त्यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी यांच्या हस्ते देण्यात आले होते,
यावेळी डॉ अनुपम बेगी म्हणाले संघटना वाढवण्याची काळाची गरज आहे संघटनेमार्फत गोरगरिबांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार सोडवण्याची मदत होते म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेमार्फत जोडत यावे असे मत डॉ अनुपम बेगी यांनी व्यक्त केले, याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज लालबेगी, राष्ट्रीय सचिव किशोर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चेतन जेधे, प्रदेश सचिव भारत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या प्रीती वालेकर, ऍड सुभाष माचरे, ऍड भीमसेन कांबळे, आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
