अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतिष कडू नागपुर
नागपूर, दि. 27 जानेवारी 2025: – महावितरणच्या नागपूर कार्यालयात 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताकाचा 76 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ मुख्यालयात महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात अधीक्षक अभियंता राजेश नाईक, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहमुख्य महेश जाधव, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, संजय वाकडे, उप विधी अधिलारी सुनिल उपाध्ये, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, सहायक संचालक (सुरक्षा व अंमजबावणी) प्रशांत तुळशी, महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता अंकुर जोशी, अधीक्षक अभियंता किशोर सूर्यवंशी यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
