अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी :गोपाळ भालेराव
बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमी नवी दिल्ली यांचे मार्फत दिला जाणारा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा *महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस *मा.श्री.तुकाराम साळुंखे.* यांना जाहीर झाला.
आपले सामाजिक चळवळीतील योगदान,समाजाप्रतीची जाणीव, तळमळ विचारात घेऊन आपणास हा राष्ट्रीय लेवलरचा ,एका महान सत्पुरुषाच्या नावाने दिला जाणारा सन्मान मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मिळालेला हा सन्मान आपणआजपर्यंत समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव आहे असं म्हणायला काही हरकत नाही.आपले मायक्रो ओबीसी चळवळीतील काम असो,कोरोणा काळातील समाजबांधवास अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप काम असेल, समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी केलेला उठाव, त्यासाठी करावी लागणारी उपोषणं असतील.आपल्या समाजाबरोबर इतर समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजूंना आपण शासकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात केलेली कामं असतील, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजनेतली हजारो प्रकरणातील आपलं योगदान असेल, तसेच तलाठी म्हणून आपण सेवेत असताना आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना दिला गेलेला *दुष्काळी निधी* असेल,तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ असेल, विविध थोर नेत्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांचे विचार समाजासमोर मांडून समाजबांधवांची वैचारिक उंची वाढविण्याचे काम असेल. अशा एक ना अनेक कामांचा परिपाक म्हणजे आपणास मिळालेला आपल्या कार्याचा हा गौरव आहे.
आपणास मिळालेला पुरस्कारचा वितरण समारंभ पणजी (गोवा) येथे दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री व अकॅडमीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.ही बाब आमच्यासाठी फार अभिमानाची व गौरवास्पद आहे. आपल्या हातून समाजकार्याचा आलेख असाच उंचावत जावो ही अपेक्षा. आपल्या जीवनात यांसारख्या अनेक पुरस्कारांची भर पडो या सदिच्छा शुभेच्छुक….!!!
श्री.लालासो मुकुंद साळुंखे.(सर)
श्री पंचक्रोशी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज.बोरगांव.
त्या.तासगांव जि.सांगली.
