अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा ६वा वर्धापन दिन आनंदात आणि जल्लोषात साजरा केला
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा ६वा वर्धापनदिन आपल्या आदरणीय प्रवासी, रेल्वे चाहते, ट्रेन कर्मचारी, कोचिंग डेपो कर्मचारी आणि मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसह उत्साहात साजरा केला. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याच्या वेळी आपल्या देशाच्या विविध भागांतील रेल्वेप्रेमी या उत्सवात सामील झाले.
मध्य रेल्वेची 22221/22222 राजधानी एक्सप्रेस दि. १९.१.२०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान एक प्रथम वातानुकूलित, ३ वातानुकूलित द्वितीय, ८ वातानुकूलित तृतीय आणि एक पॅन्ट्री कारसह चालवली गेली. या ट्रेनला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की लॉन्च झाल्यापासून एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दोन अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय आणि वातानुकूलित तृतीय कोच जोडण्यात आले.
ही ट्रेन द्वि-साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि दि. १३.९.२०१९ पासून आठवड्यातून ४ वेळा हिची सेवा वाढविण्यात आली, दुसऱ्या वर्धापन दिनी म्हणजे दि. १९.१.२०२१ पासून, ट्रेन सेवा दररोज वाढविण्यात आली.
पुश-पुल तंत्रज्ञानावर धावणारी भारतातील पहिली ट्रेन होण्याचा मान मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला मिळाला आहे, ज्यामुळे सरकारच्या “मिशन रफ्तार”ला सक्षम बनवून रेल्वे इतिहासात आणखी एक टप्पा गाठला आहे. पुश-पुल मोडमध्ये एक इंजिन पुढे आणि एक मागच्या बाजूने ट्रेन चालवणे समाविष्ट आहे ज्यामुळे घाट विभागात बँकर्सना जोडण्याची गरज नाहीशी होते ज्यामुळे मौल्यवान वेळेची बचत होते आणि प्रवासाचा वेळ कमी होतो.
सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज १६.०० वाजता सुटते आणि कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, भोपाळ, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर आणि आग्रा येथे थांबून दुसऱ्या दिवशी ०९.५५ वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचते. हजरत निजामुद्दीन येथून दररोज १६.५५ वाजता सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ११.१५ वा. पोहोचते.
ही प्रतिष्ठित राजधानी एक्स्प्रेस भारतीय रेल्वेच्या प्रगतीचे प्रतीक आहे, प्रवाशांना वेग, आराम आणि विश्वासार्हता प्रदान करते आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेमध्ये बेंचमार्क सेट करते.
—–
दिनांक: १९ जानेवारी २०२५
प्रप क्र: 2025/01/16
सदर प्रसिद्धीपत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केले आहे.








