एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकअप चोरणाऱ्या तीन आरोपींच्या पंढरपूर तालुका पोलीसांनी आवळल्या मुसक्या, पंढरपूर तालुका पोलीसांची दमदार कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

प्रतिनिधी संभाजीपुरीगोसावी

चाकूचा धाक दाखवून मोबाईल व पिकअप चोरणाऱ्या तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या, 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, पंढरपूर तालुका पोलीसाची कामगिरी, संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 45 /2025 बी एन एस कलम 309(6) या रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकप गाडी क्रमांक एमपी 09S3010 या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत पिकअप गाडी जबरदस्तीने चोरून पिकप गाडी घेवुन पळून गेले होते, पंढरपूर तालुका पोलिसांनी अगदी कसून तपास करीत सदर गुन्ह्यामध्ये आरोपींच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरच गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे, सदर गुन्ह्यातील आरोपींची नावे गोविंद लिंबा पवार (वय 23) (रा. अंकोली ता. मोहोळ) निबालअहमद शेख (वय 21) रा. चिंचोली ता. पंढरपूर ) संच्या मिटकरी (वय 32 ) रा.आंबे चिंचोली ता. पंढरपूर ) असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडूंन फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक मप 09 S3010 असा एकूण किंमत रुपये 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश मिळाले आहे, सदर तीनही आरोपींना अटक केलेली आहे सदर गुन्हा घडल्यापासून काही तासांतच आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून विशेष कौतुक आहे, सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर उपनिरीक्षक भारत भोसले पो.कॉ. गजानन माळी पो.कॉ. विनायक क्षीरसागर ए एस आय तोंडले पो.कॉ. रोकडे पो. कॉ.सागर गवळी पो. कॉ. आवटी यांच्या पथकांने केली आहे,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link