अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय नांदेड:-माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फांऊन्डेशन महाराष्ट्र .या समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.महेशजी सारणीकर सर यांनी समितीमध्ये काम करणाऱ्या अनेक पदाधीकारी यांना पदोन्नती देवुन त्यांच्या गौरव करतांना दिसत आहेत.याच कार्याचा गौरव म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील छोट्याश्या खेड्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील रहिवाशी व समितीमध्ये मागील दोन वर्षापासुन नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्य करत होते.
माधव काईतवाड बोरगडीकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला पाहता त्यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पदोन्नती व दैनिक युवक आधार वृत्तपत्रांच्या हिमायतनगर तालुका प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
आजच्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडिया तसेच दैनिक वर्तमानपत्राद्वारे अनेक पत्रकार कार्य करत आहेत. पत्रकार क्षेत्रातील नव्याने नावलौकिक मिळवलेले हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार माधव काईतवाड बोरगडीकर यांनी आपल्या् प्रखर निर्भीड, लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच अगदी सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.
त्यामुळे अल्पवधीतच यांनी नावलौकिक मिळवल्याने. त्यांच्या या कार्याला पाहता समितीने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
यानिवडीसाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.महेशजी सारणीकर सर.कार्याध्यक्ष श्री.सखाराम पंत कुलकर्णी.विनोद गायकवाड सर.विकास गोरवाडकर सर.मराठवाडा अध्यक्ष राजु शिंदे सर.ओमप्रकाश पत्रे.नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री.महादेव उप्पे. सह लोकतंत्र न्युज लाइव्ह चे कार्यकारी संपादक अभिषेक बक्केवाड.बाबाराव जेरगेवाड.नांदेड न्युज लाइव्ह चे संपादक अनिलजी मादसवार.लक्ष्मण भैरेवाड.विजय वाठोरे.दाऊ गाडगेवाड.अंगद सुरोशे.कृष्णा राठोड सह अन्य सहकारी मित्रांनी शुभेच्छा दिल्या… .








