अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक : दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी गणेश कला क्रीडा स्वारगेट पुणे येथे रोटरी क्लब पुणे 3131 व भाग्यश्री सखी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांना आमंत्रित करण्यात आले.दिव्यांगांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्या साठी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी मधु तारा आणि कृषी गौरव यांच्या संयुक्त दिव्यांगानी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनासाठी स्टॉल ही उपलब्ध करण्यात आला.
दिव्यांगानसाठी रोजगार मेळावा कृत्रिम उपकरणे तसेच अन्य ही उपक्रम या वेळी राबविले गेले.या वेळी मधु तारा सोबती कृषी गौरव फाऊंडेशनचे श्री ज्ञानेशजी सिंह.मधु ताराच्या मीनाक्षीताई शिंदे.मधु ताराचे मांजरी येथील दत्त मंदिर प्रतिष्ठानचे श्री शिवाजी दादा गायकवाड. श्री सागरदादा नहार. मधु तारा सोबती एकवीटास कंपनीचे श्री संग्रामदादा पाटील.तसेच मधु ताराशी जोडल्या गेलेले राज्यभरातील असंख्य दिव्यांग बंधू भगिनी या मेळाव्यास उपस्थित होते.
या वेळी मधु तारा प्रमुखांनी रोटरी क्लब पुणे व भाग्यश्री सखी यांचे दिव्यांगांसाठी खूपच उत्कृष्ठ कार्यक्रम घेतल्या मुळे अभिनंदन केले. तसेच सन्मानित केल्या बद्दल रोटरी क्लब व भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा भाग्यश्री मॅडम यांचे आभार व्यक्त केले.








