अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
उंब्रज पोलीस ठाणेंने डिसेंबर महिन्यांत NBW वॉरंट बजावणी मध्ये तसेच CCTNS मध्ये उंब्रज पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर :- पोलीस अधीक्षक समीर शेख, संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांनी उंब्रज पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून उंब्रज पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, असे उदागार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहेत. उंब्रज पोलीस ठाणे हे विविध गुन्ह्यांचा छडा लावून कामगिरीने उत्कृंष्ट नेहमीच अव्वल ठरत आहे, उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे हे पोलीस ठाणे नेहमीच प्रयत्नशील, असे म्हणत उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष अभिनंदन करीत पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले, यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांच्या उपस्थिंतीत उंब्रज पोलीस पोलीस ठाणेला सन्मानित करण्यात आले आहे, यावेळी पुढेही अशीच उत्कृंष्ट कामगिरी करावी अशा शुभेच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
