अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
उत्तमनगर :- कै. रामचंद्र मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र चंद्रकांतजी मोरे यांनी आर.एम फाउंडेशन ची स्थापना करत मोरे स्पोर्ट क्लबचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या दिव्यांगरत्न सौ. अनिताताई तुकाराम इंगळे, मा. प्रदेश उपाध्यक्ष मारुती भाऊ किंडरे व अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रवक्ते साहित्यरत्न डॉ.गणेश राऊत यांच्या शुभहस्ते फीत कापत करण्यात आले.
मोरे स्पोर्ट क्लब या ठिकाणी क्रिकेट, स्केटिंग, हॉलीबॉल, बास्केटबॉल, व तायकांडो कोचिंग क्लासेस वय वर्ष पाचच्या पुढे दशरथजी भिरामे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहेत. आपल्या पंचक्रोशीतील मुलांसाठी ही एक पर्वणीच आहे आजची पिढी ही मोबाईलच्या वापरामुळे शारीरिक स्वास्थ हरवलेले आहेत क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात या मुलांना आपलं भविष्य घडवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मोरे कुटुंबियांनी तयार केला आहे त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्यातील मुले मुली यांनी राष्ट्रीय स्तरावर या खेळातून प्राविण्य मिळवाव असं मत जिल्हा परिषद सदस्य सौ. अनिताताई इंगळे यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वर्षाताई मोरे यांनी केले..
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक चंद्रकांत मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमाला मां. माणिक शेठ दुधाने, सौ. रूपालीताई मोरे, दत्ताभाऊ जोरकर, दशरथ भिरामे सर, राहुल एलगुंडे, व इतर सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन प्रशांत महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल सावंत सर यांनी केले..