अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संभाजी पुरीगोसावी : स्वर्गीय कै.बबनराव बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (अण्णा) यांना आज 20 वर्ष पूर्णता, अण्णांच्या आठवणीला मिळाला उजाळा, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यांतील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप भूमीतील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील माझे वडील माझ्या कुटुंबाचा एक मोठा आधारस्तंभ स्वर्गीय कै. बबनपुरी बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (अण्णा) यांना आज जवळपास 20 वर्षे पूर्णता झाली, अतिशय शांत स्वयंमी प्रेमळ असं त्यांचं कुटुंबामध्ये नेतृत्व होते, अण्णा म्हणून त्यांची ओळख होती, दीर्घ आजारांने सन 2005 साली राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली होती, मी सन 2005 मध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होतो, आमचे मोठे बंधू निवास पुरीगोसावी यांनी माझ्या वडिलांचे सर्व दशक्रिया विधी मोठ्या उत्साहांत पार पाडले, पुरीगोसावी कुटुंबात नुकतेच अण्णांचे बंधू उत्तम पुरीगोसावी उर्फ (दादासाहेब) त्यांचे बंधू त्यानंतर रामचंद्र पुरीगोसावी उर्फ (तात्या) यांचीही अचानक देवाज्ञा झाली, हे तिन्ही व्यक्ती कुटुंबामध्ये अजूनही असणे हे महत्वांचे होते, त्यांच्या जाण्यामुळे कुटुंब पोरका झाला आहे, माझे वडील बबनराव बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (अण्णा) यांनी देखील आपला जीवनप्रवास अतिशय शांतप्रिय स्वयंमी प्रेमळ असं त्यांचे नेतृत्व होते अण्णांचा जनसंपर्क देखील मोठा होता, अण्णांनी आपल्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आपल्या पत्नीसह एक मुलासमवेत संसार फुलवला होता, अण्णांच्या प्रवासात चांगले वाईट दिवस देखील त्यांनी अनुभवले, कुटुंबातील सर्व सदस्यांशी तसेच पै. पाहुवणे,नातेवाईक व त्यांच्या जवळकीचे सहकारी मित्र आणि करंजखोप पिंपोडे वाघोली या गावातील नागरिकासमवेत देखील प्रेमळ स्वभाव ठेवला होता, खरंच अण्णा तुमची आठवण अजूनही आपल्या कुटुंबाच्या समोर आहे, माझ्या वडिलांना तुम्हां सर्वांकडून आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो.
