अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
कोंढवे धावडे :- स्वराज्य जननी आई जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक श्रीकांतजी धावडे यांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय छावा संघटना व लक्ष्मीचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी जर आई जिजाऊ नसत्या तर नसले दिसले शिवबा आणि शंभू छावा नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा अशी असावी माता जिचा अभिमान वाटावा अशा आई जिजाऊ मानाचा मुजरा तसेच युगपुरुष जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नको असा संदेश देणारे तरुणांसाठीचा चिरंतर झरा असे स्वामी विवेकानंद विश्वात निराळी व्यक्तिमत्व असणारी ही दोन व्यक्तिमत्व त्यांचे विचार आणि त्यांचा संदेश जपण्याची ही काळाची गरज आहे असे मत यावेळी डॉ.गणेश राऊत त्यांनी व्यक्त केले.
या अभिवादनाच्या वेळी ज्येष्ठ नागरिक दादासाहेब गायकवाड, बांधकाम व्यवसायिक शिवाजी तात्या धावडे, व्यंकट मुरली, चिरंजीव पाटील, श्रीरंग गायकवाड, किरण दगडे, व प्रशांत महाजन हे उपस्थित होते.