अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
पाचगणीत अवैध व्यवसायिकांना पोलिसांची भरली धडकी, स.पो.नि. दिलीप पवार यांच्यासह टीमचे पाचगणीकरांकडून पोलिसांचे विशेष कौतुक संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) सातारा जिल्हा पोलीस दलातील पाचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी 17 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस पाचगणी ठाणेचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि व्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील,स.पो.नि. दिलीप पवार यांना सिंघम पोलीस अधिकारी म्हणून पोलीस खात्यात ओळखले जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलात देखील त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाणे भिगवण पोलीस ठाणे,अशा विविध पोलीस ठाणेत त्यांनी प्रभारी अधिकारी म्हणून यशस्वीपणे आपली सेवा दिली, सध्या सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये ते कार्यरत असून पाचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, महाबळेश्वर पाचगणी हे ठिकाणे पर्यटन स्थळ असल्याने हंगामात दोन्हीही ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते, यामध्ये पाचगणी वरून महाबळेश्वर कडे जाण्याचा मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडीची देखील मोठी समस्या होती, स.पो.नि.दिलीप पवार यांच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांसह पाचगणीकरांनी वाहतुकीबाबत देखील मोकळा श्वास घेतला आहे, पाचगणी आणि महाबळेश्वर या पोलीस ठाणेला आजपर्यंतच्या इतिहासात सर्वच अधिकारी हे सिंघम अधिकारी लाभले होते, स.पो.नि.दिलीप पवार यांनी देखील पदभार घेतल्यापासून त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील पाचगणी करांकडून विशेष कौतुक होत आहे, पाचगणी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या तसेच अवैधरित्या चालणाऱ्या व्यवसायिकांवर पोलिसांची देखील चांगलीच करडी नजर आहे, पाचगणी भिलार येथील हिराबाग हॉटेलमध्ये झालेल्या छमछम प्रकरणात जवळपास 20 जणांना नोटीस देवुन पाचगणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्यामुळे सध्या पाचगणी अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
