एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जालना जिल्हा पदाधिकारी बैठक संपन्न

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

जालना प्रतिनिधी रमेश सूर्श : www.dakshvedh.in या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. दर्पण दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक कल्पतरू पार्क, अंबड चौफुली जवळ, जालना या समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनच्या चतुर्थ वर्धापन दिन, www.dakshvedh.in वेब पोर्टलचे उद्घाटन आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण समितीच्या कार्याचा वार्षिक आढावा या अनुषंगाने बैठक घेण्यात आली.

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अधिकृत मुखपृष्ठ यानात्याने आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामपंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते www.dakshvedh.in या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

१० जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनचा चौथा वर्धापन दिन होता, जानेवारी २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून हळूहळू विकसित होत होत फौंडेशन आणि फौंडेशन व्दारे संचालित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे आज वटवृक्षात रुपांतरण झाले आहे. अजूनही बरेच कार्य पुढे वाढवणे आणि तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, त्यासाठी समितीच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांची आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

नियोजित राज्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणीची आज एकत्रित बैठक घेवून जालना जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली. समितीच्या विकासासाठी चार “स”कारांची चतु:सुत्री म्हणजे संपर्क, समन्वय, संघटन आणि समाजकार्य ज्यातून समितीचा विकास कसा साधायचा याचा दृष्टीकोन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांनी उधृत करून सांगितला आणि माहिती अधिकाराचा वेगवेगळ्या संकल्पनेतून कसा समाजकार्यासाठी वापर करता येतो ही भूमिका महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामपंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केली, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री राजू शिंदे यांनी वेगवेगळ्या शासकीय स्तरावरील लुटमार आणि सामाजिक समस्या त्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून उपाय करण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि संघटनात्मक कार्य वाढवण्यासाठी मराठवाडा विभागीय समन्वयक श्री रमेश सुरशे यांनी प्रतिपादन केले.

बैठकीस जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री गोविंद जोशी, जाफ्राबाद तालुका अध्यक्ष श्री अशोक म्हस्के, कार्याध्यक्ष श्री राजेश दामधर, का. स. श्री गजानन फलफले, श्री सुरेश खंदाडे, सौ. गोदावरी लेंभे, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष श्री सुरेश धारे, उपाध्यक्ष श्री समाधान निकाळजे, घनसावंगी तालुका उपाध्यक्ष श्री अर्जुन ढेरे, श्री शंकर हिवाळे, जालना तालुका उपाध्यक्ष श्री कोंडीबा अनपट, भोकरदन तालुका सहसचिव श्री गोपाळ गुजर, मंठा तालुका अध्यक्ष श्री निवृत्ती गायके, पैठण तालुका सहसचिव श्री ऋषिकेश सुरशे यांची उपस्थिती होती.

आजपर्यंत केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून सत्कार करण्यात आला जसे की, श्री राजू शिंदे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी, श्री रमेश सुरशे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष पदी, श्री अशोक म्हस्के यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी, श्री सुरेश धारे यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी, श्री निवृत्ती गायके यांची जालना जिल्हा सहसचिव पदी, श्री राजेश दामधर यांची जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी, सौ. गोदावरी लेंभे यांची जाफ्राबाद तालुका महिला अध्यक्ष पदी, श्री अर्जुन ढेरे यांची घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी, श्री ऋषिकेश सुरशे यांची छ. संभाजीनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link