अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : समाधान पाटील. धुळे :- शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे श्री आबासाहेब सतिलाल भटा पाटील निवासी व आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव निमित्ताने ‘महिला शिक्षण दिन’, व ‘बालिका दिन’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भारतातील थोर समाज सुधारक देशातील पहिल्या मुख्याध्यापिका शिक्षिका कवयित्री सत्यशोधिका सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त महिलांसाठी प्रेरणादायी असून आज महिला सन्मानाने जगत आहे ती केवळ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच !. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केले.मुख्याध्यापक माननीय आर वाय सोनवणे सर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय एस एस पावरा सर व सुनील चौरे सर. तसेच आभार प्रदर्शन अमोल पाटील सर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विषयी विद्यार्थी नी भाषण केले उदय पाटील सर पावरा सर वसईकर सर वसावे सर श्रीमती किरण मॅडम योगिता मॅडम अनिता मॅडम गवळी मॅडम अधीक्षिका मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मैत्रिणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
