अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : प्रदिप मोरे. निफाड :- सिम्बॉल ऑफ नॉलेज संस्थेच्या वतीने गरजू मुलांना साहित्य वाटप केल्या जातो तसेच संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घेतल्या जातो संस्था ही गरीब अंध अपंग मुलांना तसेच निराधारांना सतत मदत करत असते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,सिम्बॉल ऑफ नॉलेज संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांच्या पुतण्या निहांश निखिल निखाळे यांच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या अवचित्य साधून जिल्हा परिषद रसलपुर निफाड या शाळेच्या मुलांना शालेय साहित्य व शाळेला खुर्ची वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सभासद अध्यक्ष राकेश निखाडे, उपाध्यक्ष दादाराव काऊतकर ,सचिव प्रेम वाघ, खजिनदार विनोद गायकवाड, सहसचिव प्रवीण कोळी, सदस्य सुनील साळवे ,विक्रम आढाव ,दादाराव पंडित हे उपस्थित असून यांचे मोलाचे सहकार्य असल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शाळेत असताना मुलांना महापुरुषांचे विचार दिले पाहिजे त्यामुळे मुलांमध्ये नक्कीच शैक्षणिक व सामाजिक विकास होईल व पुढे जाऊन मुले शिक्षणाला महत्त्व देतील एक प्रकारे भारत देशाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असेल असे बोलण्यात आले.
तसेच संस्थेचे खजिनदार विनोद गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे ध्येय धोरण सांगितले की संस्था ही गरीब अंध अपंग मुलांना तसेच निराधारांना मदत करेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करेल.
यावेळी संस्थेचे सर्व सभासद तसेच संस्थेचे सहकारी प्रशांत निकाळे, सचिन खडताळे, गोकुळ, राहुल निकाळे ,अजिंक्य निखाळे, साहिल निकाळे, ओम निकाळे , सात्विक निकाळे महिला सभासद कमलाबाई निकाळे, शितल निकाळे , सुमेधा निकाळे हे उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली अहिरराव मॅडम शिक्षिका दुसाने मॅडम आकांक्षा निकाळे तसेच अंगणवाडी शिक्षिका जयश्री निकाळे मदतनीस उषा निकाळे यांचे सहकार्य लाभले.
गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव डुंबरे,तुकाराम सातभाई, दशरथ निकाळे, मधुकर निकाळे, बाळासाहेब निकाळे, सुभाष सातभाई व ग्रामपंचायत सदस्य सचिन निकाळे, प्रशांत गोसावी, गोकुळ कुंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.
